औरंगाबाद, दि.२५मे २०२०: औरंगाबाद जिल्ह्यात साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलण्याचे अधिकार महामारी रोग अधिनियम १८९७ नुसार ६ जिल्हाधिका-यांना सोपविण्यात आले आहे. त्या अंतर्गत प्रभावी व्यवस्थापन व कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
या आदेशान्वये जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा प्रदात्यांनी कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्याच्या दृष्टीने निर्देशित मार्गदर्शक सुचना पाळणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कोणत्याही संस्थेत येणाऱ्या रुग्णाला कोविड १९ ची लक्षणे असो अथवा नसो त्या रुग्णाला संस्थेमध्ये सामान्यत: पुरविण्यात येणाऱ्या सेवा देण्याचे नाकारता येणार नाही.
प्रत्येक आरेाग्य सेवा संस्थेमध्ये कोविड-१९ बाधित रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक असणारी पुर्ण तयारी असली पाहिजे. या संस्थेने ICMR आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे अनुपालन करावे. ज्या रुग्णालयामध्ये १०० पेक्षा जास्त खाटा आहेत, त्यांनी ५० टक्के खाटा कोविड-१९ बाधित रुग्णासांठी राखून ठेवाव्यात. संशयित किंवा बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर १० खाटा असणारा एक स्वतंत्र कक्ष या रुग्णासाठी राखून ठेवण्यात यावा.अशा सूचना यातून करण्यात आल्या आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: