तुळजाभवानीच्या सोने गहाळ प्रकरणातील दोषीवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

धाराशिव १२ डिसेंबर २०२३ : धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओंम्बासे यांनी ६ महिन्यापुर्वी तुळजाभवानीला दान आलेल्या सोने, चांदीची मोजदात करण्यासाठी १६ सदस्याची कमिटी गठीत केली होती. मोजणी अहवाला मध्ये काही मौल्यवान वस्तु गहाळ झाल्याचे निर्देशनास आले होते, त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी कमिटी स्थापन झाली होती, त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मौल्यवान अलंकारावर डल्ला मारणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश डाँ सचिन ओंम्बासे यांनी तहसिलदार यांना दिले आहेत. या मध्ये महंत, सेवेदार, प्रशासकिय अधिकारी यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा