अहमदनगर, दि. ४ जुलै २०२० : अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून नगर महानगरपालिका हद्दीत कालपासून दि. १७ जुलै पर्यंत संचारबंदी आदेश लागू केली आहे.
या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणालाही कोणतीच परवानगी असणार नाही, असे या आदेशात स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत.
महानगरपालिका हद्दीत कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतूक फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास या आदेशाने मनाई करण्यात आली आहे. सदरचा आदेश दि. ३ ते १७ जुलै या कालावधीत लागू राहणार आहे. सायंकाळी ७ ते सकाळी ५ या वेळेत तातडीच्या वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस बाहेर पडण्यास परवानगी असणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष