गोल पोस्ट गुन्हा कर्नल मित्रानंच केला मित्राच्या रशियन बायकोवर बलात्कार…..

कर्नल मित्रानंच केला मित्राच्या रशियन बायकोवर बलात्कार…..

कानपूर, १५ डिसेंबर २०२०: उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका रशियन महिलेनं भारतीय लष्कर अधिकाऱ्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेचा पती कर्नलचा मित्र आहे. कर्नल ला बढती मिळाल्यानं त्यानं मित्राला घरी बोलावलं.

सीओडी येथील सरकारी बंगल्यातील लाजीरवाणी घटनेनंतर पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, मात्र डीआयजीच्या हस्तक्षेपानंतर आरोपीवर बलात्कार आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. लखनौच्या गोमती नगर येथे राहणाऱ्या मित्रानं दिलेल्या वृत्तानुसार, सेंट्रल ऑर्डिनेन्स डेपोमध्ये तैनात कर्नल नीरज गहलोत हा जुना मित्र आहे. तो सीओडी ऑफिसर मेसमध्ये राहतो.

घडलेला प्रकार असा की, बढतीचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या मित्राला आणि त्याच्या रशियन बायकोला घरी बोलवलं होतं. त्यानंतर त्यानं मित्राला बेशुद्ध करून त्याच्या पत्नीवर बलात्कार केला, अशी तक्रार देण्यात आली. पिडित रशियन महिला दहा वर्षापासून भारतात वास्तव्यास आहे.

मित्रानं घरी बोलावल्यानंतर दिलेल्या पेयानंतर शुद्ध हरपली होती. याचा फायदा घेत त्यानं आपल्या पत्नीवर बलात्कार केला असा आरोप केला आहे. याशिवाय पीडितेनं विरोध केला असता मारहाण केल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version