आ. नमिता मुंदडा यांचे जिल्हाधिकारी यांना विनंती पत्र

बीड, २१ ऑगस्ट २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न चालले आहेत. अशा मध्ये नागरिकांच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. याच सोबत, कोरोना बाधीत असलेल्या रूग्णांना ज्या कोवीड रूग्णालयात/कोवीड सेंटर मध्ये ठेवण्यात आलेले आहे, त्या ठिकाणी असलेल्या सर्व बाबींची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.

याच संदर्भातील माहिती घेते वेळी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांना अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील कोवीड रुग्णालयामध्ये काही महत्वाच्या कमतरता जाणवल्या. या संबंधित त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी साहेब, बीड यांना विनंती पत्र पाठवले.

लोखंडी सावरगाव येथील असलेल्या कोवीड रूग्णालयात रूग्णांकरिता गरम पाण्यासाठी गीझर बसवण्यात यावे, आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा गरम पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. साफसफाई करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्यात यावे. तसेच, या रूग्णालयात स्टाफ नर्सेसची संख्याही वाढवण्यात यावी, आदी बाबींचा समावेश या पत्रामध्ये करून आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी जिल्हाधिकारी साहेब बीड यांना याबाबींच्या संदर्भात तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती केली.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा