उस्मानाबाद, ७ ऑगस्ट २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर, ढोकी, कसबे तडवळे आणि येडशी या चार गावांतील पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला होता. या संबंधित चार गावातील पाणीपुरवठा योजनेची ग्रामपंचायती कडे थकबाकी असल्या कारणाने दिनांक ३ ऑगस्ट २०२० रोजी या गावांतील पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता.
या संबंधित माहिती मिळताच, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तातडीने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग उस्मानाबाद यांना सद्य परिस्थिती अवगत करून या गावांचा पाणी पुरवठा पुनश्च सुरू करण्याबाबत बोलले होते.
या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग उस्मानाबादने आज दिनांक ७ ऑगस्ट पासून या संबंधित गावांना पुन्हा पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. या गोष्टींमुळे संबंधित गावांतील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड