Come soon किली

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२२: आदिवासी जमात तशी तर दुर्लक्षिलेली. पण याच आदिवासी प्रांतातली एक जोडीने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांना आपलसं केलं आहे. तो आहे तांझानियाचा स्टार किली पॉल आणि त्याची जोडीदार निमा…


नुकतचं किलीने भारतात येऊन एका वाहिनीवरच्या कार्यक्रमाला भेट दिली. सध्या सोशल मिडीयावर किली आणि निमाची धूम पसरली आहे. मनीष पॉल, नोरा फतेही आणि प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीत यांच्यासोबत किली ने ताल धरला. मूळचा तांझानियाचा असलेला किली हिंदी गाण्यांच्या रिल्समुळे प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला आहे. त्याच्याबरोबर त्याची जोडीदार निमा ही देखील तेवढीच प्रसिद्ध आहे.


किलीच्या रिल्सना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक करुन त्याचा सन्मान केला होता. त्याचबरोबर त्याच्यासारखे सगळ्यांनी प्रेरित होऊन जास्तीत जास्त सोशल मिडीयाचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.


यानंतर आता किलीची भारत भेट सध्या खूपच गाजली. त्याने अनेक ठिकाणांना भेट दिली. तसेच अनेक सेलिब्रेटींना भेटून मनमोकळा संवाद साधला.


तसेच जाताना I am sad while going to tanzaniya from india. असं सोशल मिडियावर टाकत त्याने आपले प्रेम व्यक्त केले. जाताना त्याने पुन्हा येण्याचे वचनही दिले आहे. भारत कायम अतिथी देवो भव चा आदर करत लवकरच किली परत भारतात येईल आणि सगळ्यांचे मनोरंजन करेल, यात शंका नाही. ऑल द बेस्ट किली…

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा