कर्जत, दि. २२ जुलै २०२०: कुकडीचा पाणी प्रश्न, भूसंपादन, चाऱ्याची दुरुस्ती, आदींसह शेतीच्या विविध प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी आ. रोहित पवार यांनी राशीन येथे श्री जगदंबा देवी भक्तनिवास येथे शेतकऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी, आ. रोहित पवार यांनी कुकडीच्या विविध प्रश्नावर चर्चा करताना लवकरच आपल्या भागातील शेतीतील क्रॉप पॅटर्न बदलावा लागेल यासाठी आगामी काळात विविध कार्यशाळा घेणार असून, मत्स्यशेती बाबतही सर्वांना माहिती होण्यासाठी काम करणार असल्याचे म्हटले.
यावेळी, काणगुडेवाडीचे सरपंच शाम कानगुडे, राशीनचे उपसरपंच शंकर देशमुख, मार्केट कमिटीचे संचालक शहाजीराजे भोसले, दादा परदेशी, माऊली सायकर, रामकिसन साळवे, पवन जांभळकर, हरी शेटे, ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे, अशोक जंजिरे, युवराजसिंह राजेभोसले, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, मंडळ कृषी अधिकारी संजय घालमे, अशोक सोनवणे, व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष