मुंबई ३० सप्टेंबर, २०२२ : काँग्रेस विविध वल्गना करण्यास कायमच पुढे आहे. त्यातही आता काँग्रेसने कहर केला आहे. नाना पटोले यांनी राहुल गांधींची तुलना प्रभू रामचंद्राशी केली आहे. या पेक्षा अजून कहर तो काय असेल ? राहुल गांधी सध्या भारत जोडो या यात्रेवर आहेत. पायी सुरु केलेल्या या यात्रेवरुन राहुल गांधी हे प्रभू रामचंद्राचे अवतार असल्याचं नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
प्रभू रामचंद्र ज्याप्रमाणे वनवासात लंकेपर्यंत बिना पादुकांचे चालत गेले, त्याप्रमाणे राहुल गांधी सगळीकडे विनाचपलांचे फिरत आहे. प्रभू रामचंद्राच्या पावलावर पाऊल टाकत राहुल गांधी फिरत असल्याचं नाना पटोले यांचे सागंणे आहे. राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेला भरपूर प्रतिसाद मिळत असल्याच पक्षाचं म्हणणं आहे. राहुल गांधीवर नाना पटोले यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. महाराष्ट्रातूनदेखील या यात्रेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. लोखो संख्येने लोक यात सहभागी होत आहे. हा काँग्रेसचा एक अर्थाने विजय आहे, असे दिसून येत असल्याचं नाना पटोले यांनी नमूद केलं.
देशाला वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी या पदय़ात्रेचे आयोजन केले. ज्यात अनेक धर्म पंथ जातीचे लोक सामावलेले आहेत. त्यामुळे ही पदयात्रा देशासाठी आणि पक्षासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे, असे नाना पटोले यांचे सांगणे आहे. आता हे वक्तव्य किती खरं ठरेल आणि किती खोटं… हे निवडणुकीनंतरच समजेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस