शिंप्याने चड्डी छोटी शिवली म्हणून पोलिसात तक्रार….

भोपाल, दि. १८ जुलै २०२० : हल्ली रोजच काही ना काही विचित्र घटना घडत असतात त्यातीलच हि एक घटना आहे. शिंप्याने चड्डी छोटी शिवली म्हणून एका व्यक्तीने थेट पोलिसात तक्रार केली आहे. परंतु पोलिसांनी या व्यक्तीला कोर्टात जावून केस करण्याचा अजब सल्ला देण्यात आला.

कृष्ण कुमार दुबे हा ४६ वर्षीय व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. परंतू लॉकडाऊनच्या काळात त्याची नोकरी गेली. दुबे नोकरीसाठी भोपाळमध्ये गेला होता. शहरात येण्यापूर्वी त्याने मित्राकडून एक हजार रुपये उधार घेतले होते आणि गरजोपयोगी वस्तू घेतल्या.

त्यानंतर तो शहरातल्या एका शिंप्याकडे जावून त्याने एक चड्डी शिवायला दिली. पण शिंप्याने शिवलेली चड्डी खूपच छोटी होती. म्हणून दुबे परत त्या शिंप्याकडे गेला आणि त्याने त्याला जाब विचारला. तेव्हा शिंपी म्हणाला की, ‘तू फक्त दोन मीटरच कापड दिले होते म्हणून तेवढीच शिवली.’

यावर दुबेचे समाधान झाले नाही म्हणून त्याने थेट पोलिसाकडे धाव घेतली असता पोलिसांनी कोर्टात केस कर असा अजब सल्ला दिला.अखेर शिंपीने पैसे परत देण्याचे मान्य केल्यानंतर हे प्रकरण मिटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा