नाशिक, दि.८ जून २०२० : देवसाने (मांजरपाडा) वळण योजनेतील पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रखडलेले रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करावे, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास विभागाचे कार्यकारी संचालक आणि अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे व अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकल्प कामांचा आढावा घेतला. मांजरपाडा हा नाशिक जिल्ह्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. यातून नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याला पाणी देणे शक्य होणार आहे. नाशिकसह मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे.
त्यामुळे तेलंगणा राज्यातील कालेश्वरम प्रकल्पाचा अभ्यास करून मराठवाड्याला पाणी वळविण्याबाबत अहवाल तयार करण्यात यावा अशा सूचना दिल्या. तसेच पुणेगाव, दरसवाडी कालव्यावरील १ ते २५ किलोमीटर अंतराचे विस्तारिकरणाचे काम पूर्ण झाले असल्याने अधिक गतीने पाणी पुढे जाणार असल्याने पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश भुजबळ यांनी दिले.
न्युज अनकट प्रतिनिधी: