पुणे: सध्या जगात कोरोणाचा धुमाकूळ चालू आहे. त्यामुळे सर्व वाहतूक, आयात निर्यात बंद आहे. कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा २ लाखांच्या पुढे गेला आहे. वर्ल्ड मीटर्सच्या आकेडावारीनुसार काल दुपारपर्यंत २ लाख ४ हजार ६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ८ हजार २४६ च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे जागतिक अस्थिरता निर्माण झाली आहे.
कॉरोनाचा तर देशवासीयांना दणका बसला आहेच परंतु सर्व अंतर राष्ट्रीय व्यवहार बंद झाल्याने आता लोकांना आर्थिक संकटाला देखील समोर जावे लागणार आहे. पेट्रोल-डिझेल तीन रुपयांनी महागल्यानंतर जीएसटी समितीच्या बैठकीनंतर मोबाइलवरील जीएसटीचा दर १२ टक्क्यांवरुन १८ टक्के केल्याची घोषणा करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी समितीची ३९ वी बैठक झाली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला होता.
केवळ एवढेच नव्हे तर भारतीय अर्थ व्यवस्था आधीच मंदीचा सामना करत होती आणि आता या नव्या संकटामुळे लोकांचा व्याप आणखी वाढणार आहे. बाहेरील आयात पूर्ण थांबल्याने या वस्तूंच्या किमतीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. एकूणच हा सर्व बोजा लोकांना सहन करावा लागणार आहे.
शेअर बाजारातील घसरणीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अंबंनिनी आपले पहिले स्थान देखील गमावले आहे. सर्व गोष्टींचा विचार करता आगामी काळात मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.