गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामांची आढावा बैठक संपन्‍न

महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामांची आढावा बैठक संपन्‍न

बारामती १६ फेब्रुवरी २०२१ : महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामांची आढावा बैठक तहसिलदार विजय पाटील यांचे अध्‍यक्षतेखाली प्रशासकीय भवनातील तहसिल कार्यालयात येथे पार पडली.
या आढावा बैठकीमध्‍ये तहसिलदार पाटील यांनी तहसिल कार्यालय, बारामती व पंचायत समिती, बारामती यांचे मार्फत महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू असलेल्‍या रेशीम उद्योग, वैयक्तिक वृक्ष लागवड, रोपवाटिका, फळबाग लागवड, रस्‍ते, ओढा खोलीकरण,घरकुल, सिंचन विहीर, गाय गोठा, कुकुट पालन शेड, शेळीपालन शेड, वैयक्तिक शोष खड्डा इत्‍यादी कामांचा आढावा घेतला. तसेच रेशीम उद्योग हा एक शेतीपूरक उद्योग आहे.
शासनाकडून या उद्योगाकरीता चांगल्‍या सवलती देण्‍यात आल्‍या असल्‍याने जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन तहसिलदार विजय पाटील यांनी केले.यावेळी निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव,नायब तहसिलदार महादेव भोसले, नायब तहसिलदार पी.डी.शिंदे,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोहन पवार, तांत्रिक अधिकारी सुरज पवार, विजय निंबाळकर व अमोल सोनवणे,नवनाथ जाधव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव
error: Content is protected !!
Exit mobile version