नवले ब्रीज ते कात्रज रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा आयोजित

पुणे, २९ ऑक्टोबर २०२० : पुणे- बंगळुरु महामार्गावर सतत वाहनाची वर्दळ सुरु असते. रहदारीच्या या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघात होत असतात. वाढत्या वाहनांची संख्या पाहता कात्रज चौक ते नवले ब्रिज या ३.८८ किलोमीटर रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे नोव्हेंबर २०१९ मध्ये केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्री मा.श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

या रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टीचे आमदार मा.श्री.भीमराव अण्णा तापकीर तसेच या दौर्‍यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे श्री.धनंजय देशपांडे, नाईक मॅडम, संबंधित कन्सल्टंट कंपनीचे अधिकारी, तसेच भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष अरुण राजवाडे, मा. नगरसेवक शंकरराव बेलदरे, खडकवासला भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बदक, कुणाल बेलदरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते .

या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर महामार्गावर होणार्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, तसेच महामार्गावर अपघात होणारे अपघात टाळता येतील. लवकरच हा रस्ता वाहतूकीसाठी खुला होईल अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा