आत्मविश्वास पडला महागात, मित्रांनीच दारू पिऊन केला बलात्कार…

जबलपूर, २४ फेब्रुवरी २०२१: मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका १९ वर्षाच्या मुलीवर दोन मित्रांसह सामूहिक बलात्कार करण्यात आला. दारू पिऊन आरोपीने नशेच्या अवस्थेत या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. मुलगी आरोपींशी आपण मित्र आहोत तुम्हाला मैत्रीची शपथ अशी विनवणी करीत राहिली, पण नराधम मात्र तिचे लचके तोडत राहीले.

आत्मविश्वास महागात पडला मित्रांनीच दारू पिऊन केला बलात्कार…

पीडित मुलीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तेथून पोलिसांनी केस डायरी भेडाघाट पोलिस ठाण्यात दिली आहे. गारहा येथील १९ वर्षीय रहिवासी लम्हेताघाट येथील रहिवासी गुलशन राजपूत आणि सत्यम राजपूत यांच्याशी मैत्रीण होती. शुक्रवारी ही मुलगी नर्मदा जयंतीच्या भेडाघाटावर गेली होती. दुपारी सत्यमने त्या मुलीला सांगितले की गुलशनच्या घरी फिरायला जाऊ. तिने त्यांच्या वर विश्वास ठेवला आणि ती दोघांसह निघून गेली. त्यावेळी गुलशनच्या घरात कोणी नव्हते. मुलीच्या म्हणण्यानुसार, दोघांनीही दारू पिली आणि नंतर त्या मुलीला जबरदस्तीने दारू पाजली आणि सत्यम व त्यानंतर गुलशनने तिच्यावर बारी बारी ने बलात्कार केला.

बहिणीला पाहून आरोपी पळून गेला….

बर्याच वेळानंतरही ती घरी परतली नाही तेव्हा तिची मोठी बहीण तिच्या शोधात लम्हटाघाटावर गेली. बलात्कारानंतर आरोपी पीडित मुलीला दुचाकीवरून तिच्या घरी सोडायला निघाला होता. वाटेत त्याने पिडित मुलीच्या मोठ्या बहीणीला पाहिल्यावर दोघेही पीडितेला तिथेच सोडून फरार झाले. त्यांनंतर पीडितेने तिच्या बहिणीला ही सर्व घटना सांगितली आणि बहिणीने तिला पोलिस स्टेशनमध्ये नेले.तेथे पोलिसांनी आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि एससी-एसटीचा गुन्हा दाखल केला व केस डायरी भेडाघाट पोलिस ठाण्याला सोपवली.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत आरोपी….

भेडाघाट टीआय शफीक खान यांच्यानुसार दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रकरण एससी-एसटीचे असल्याने केस डायरी अजॅक पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे. तेथून पुढे कार्यवाही होईल. पीडित मुलीच्या मेडिकलमध्ये पोलिसांना एमएलसी मिळाला आहे. जेथे बलात्काराची पुष्टी झाली आहे.आरोपींनी घटनेच्या वेळी घातलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा