काँग्रेस पक्ष विरोधातच बसणार: थोरात

नवी दिल्ली : काँग्रेसने सत्तेत सहभागी न होता विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिल्लीत काँग्रेस अध्यक्षणांच्या भेटीसाठी गेले होते.परंतु त्यांना सोनिया गांधी यांनी भेट नाकारली. तसेच गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी.वेणूगोपाल यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. या बैठकीनंतर राज्यातील काँग्रेसने विरोधात बसण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
हे घडत असताना मात्र दुसरीकडे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा