मुंबई : कॉंग्रेस–राष्ट्रवादीची दिल्लीतील सयुंक्त बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या सर्व मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे सर्व मुद्यांवर एकमत झाले आहे, अशी माहिती कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणव नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आता कॉंग्रेस आघाडीतील इतर पक्षांशी मुंबई येथे चर्चा करणार आहे. आणि शिवसेना पक्षप्रमुखांशी अंतिम चर्चा करून आता निर्णय घेणार आहे. असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्यामुळे काँग्रेस -राष्ट्रवादीचं ठरलं आता निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे.
राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा दोनचं जागा कमी मिळाल्या आहेत. त्यामुळे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाही मिळावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे, असे सुनील तटकरे म्हणाले आहेत.आता यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.