दिल्लीतील आंदोलनाला काॅंग्रेस व डाव्यांची फूस: सदाभाऊ खोत

बारामती, २ फेब्रुवरी २०२१: दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला काॅंग्रेस व डाव्यांची फूस आहे आणि आता आंदोलनात नक्षलवाद व दहशतवाद माजवू पाहणारे घुसले आहेत. अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

केंद्राने कृषि कायद्यात काही बदल करावेत मात्र कायदा रद्द करू नये, नाहीतर शेतकऱ्यांच्या पायात असणाऱ्या बेड्या सुटणार नाहीत असे बारामतीत २०१२मध्ये ऊसदरवाढ आंदोलन दाखल गुन्ह्याच्या संबंधित न्यायालयीन कामासाठी आले असता खोत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

३२ वर्षांपूर्वी शरद जोशी व महेंद्रसिंह टिक्कैत यांनी शेतकऱ्यांचा मेळा आयोजित केला होता. त्यावेळी केलेल्या लायसन परमीट राज बंद करा, शासनाचा शेतीतील ह्सतक्षेप कमी करा अन्य मागण्या सरकारने आंदोलन मोडीत काढले होते. त्यावेळी जोशींच्या डोळ्यातील अश्रू आज महेंद्रसिंह यांचे पुत्र राकेश यांच्या डोळ्यात दिसत असल्याचे खोत म्हणाले.

जातीवंत शेतकरी गोंधळ, दंगा करू शकत नाही. भावनिकेतेवर लोक जमा झाले आहेत,कृषि कायद्यात काही बदल जरूर करावेत. याचा अर्थ लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नव्हे तर दिल्लीचे तख्त काबीज करण्याच्या हेतूने हे आंदोलन सुरु असल्याचे खोत म्हणाले. बंदीस्त पिंजऱयाचे दार उघडण्याचे काम केंद्राने केले आहे. परंतु काही बांडगूळ हा पिंजरा बंदीस्त ठेवण्यासाठी काम करत आहेत.अनेक राज्ये कायद्याच्या बाजूने असल्याचेही ते म्हणाले.

केंद्राने अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द करावा, आयात-निर्यात धोरण पाच वर्षांसाठी आखावे, अनावश्यक शेतमाल आयात करू नये, सिंलिंग अॅक्ट रद्द करावा, भीकवादी योजना रद्द करून
रोजगारवादी योजना राबवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हा तर पवारांचा दुट्टप्पीपणा

एकीकडे बारामतीच्या कृषि प्रदर्शनात करार शेतीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे केंद्राच्या कायद्याला विरोध करायचा हा पवारांचा दुट्टपीपणा असल्याचे खोत म्हणाले. काॅंग्रेसनेच राज्यात २००६ साली करार शेतीचा कायदा मंजूर केला. करार शेतीचा उगम बारामतीत झाला. बारामतीतून ही गंगा मुंबईत समुद्राला जावून मिळणे अपेक्षित असताना ती गटाराला कशी मिळाली ? असा सवाल त्यांनी केला.

लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात पवार यांनी शेतकऱ्यांना मार्केट बाहेर शेतमाल विकता आला पाहिजे म्ङणजे आडत, हमाली, सेस, जागाभाडे द्यावे लागणार नाही, असे लिहितात. दुसरीकडे त्या विरोधात भूमिका घेतात हा दुट्टप्पीपणा आहे. त्यांचे आत्मचरित्र कृषिनिती म्हणून लागू करा, आम्ही त्याचे स्वागत करू,असेही खोत म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा