काँग्रेसने नेमले लोकसभा निवडणूक निरीक्षक, सतेज पाटील रत्नागिरी, रायगडचे जिल्हा निरीक्षक

कोल्हापूर, ६ ऑगस्ट २०२३: कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी व रायगड जिल्हा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईत राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची सविस्तर माहिती मिळावी याकरता लोकसभा क्षेत्र निहाय निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

त्यानुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून लोकसभा क्षेत्रनिहाय निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये आमदार सतेज पाटील यांची रत्नागिरी व रायगड जिल्हा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. कोल्हापूरसाठी समन्वयक म्हणून अभय छाजेड व रणजित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा