“काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष, जर तो टिकला तर देश टिकंल”, कन्हैया चा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2021: राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कन्हैया कुमार मंगळवारी काँग्रेसमध्ये दाखल झाले. गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत, परंतु त्यांनी अद्याप औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, कन्हैया कुमार म्हणाले की, जेव्हा काँग्रेस टिकंल तेव्हाच देश टिकंल. त्याचवेळी जिग्नेश मेवाणी म्हणाले की, आज आपलं संविधान, लोकशाही धोक्यात आहे, ती आपल्याला वाचवायची आहे.

कन्हैया कुमार म्हणाले, मला असं वाटतं की या देशातील काही लोक, ते फक्त लोक नाहीत, तर ते एक विचार सरणी आहेत. ते या देशाची परंपरा, संस्कृती, मूळ, इतिहास, वर्तमान आणि भविष्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठंतरी मी वाचलं की तुम्ही तुमचा शत्रू निवडा, मित्र आपोआप बनतील. म्हणून मी निवड केली आहे. आम्हाला लोकशाही पक्षात सामील व्हायचं आहे कारण आता असं वाटतं की जर काँग्रेस टिकला नाही तर देश टिकणार नाही.

ते म्हणाले, मी तुम्हाला स्पष्ट करतो की पंतप्रधान अजूनही देशात आहेत, पूर्वीही होते आणि पुढेही राहतील, पण आज जेव्हा आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत फॉर्म भरत होतो, तेव्हा सहकारी जिग्नेश यांनी एक संविधानाची प्रत दिली आणि गांधी-आंबेडकर आणि भगतसिंग यांचं चित्र दिलं. कारण आज या देशाला भगतसिंगांच्या मदतीची गरज आहे. आंबेडकरांची समानता आवश्यक आहे आणि गांधींची एकता आवश्यक आहे.

कन्हैया म्हणाले, सर्वात मोठा विरोधी पक्ष वाचला नाही तर देश टिकणार नाही. जर मोठं जहाज वाचलं नाही, तर लहान बोटीही टिकणार नाहीत. मी जिथं जन्मलो, ज्या पक्षात मी मोठा झालो, त्यानं मला शिकवलं, मला लढण्याची जिद्द दिली. मला त्या पक्षाचे लाखो आणि करोडो लोकांसह आभार मानायचे आहेत जे कोणत्याही पक्षाचे नव्हते, पण जेव्हा आमच्यावर कोणत्याही पक्षाकडून अनावश्यक आरोप केले गेले तेव्हा ते आमच्यासाठी व्हॉट्सअॅपवर लढत होते. केवळ काँग्रेसच या देशाला नेतृत्व देऊ शकते.

ते म्हणाले की मला खात्री आहे की स्वत: ला लोकशाही पक्ष म्हणवणारी काँग्रेस सत्तेला प्रश्न विचारण्यात आणि लोकांच्या संघर्षासाठी लढण्यात आमचं समर्थन करेल. कन्हैया यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवत म्हटलं की, तो संघ परिवार नाही. ते कुटुंब कसलं जे तुम्हाला तुमचं कुटुंब सोडून संघ बनवावा लागेल. महात्मा गांधी आपल्या पत्नीसह ब्रिटिशांशी लढले. इतिहासावर एक नजर टाका आणि पहा की प्रत्येकजण आपल्या कुटुंबासह राहत होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा