22,842 कोटींच्या घोटाळ्यावर काँग्रेसचा केंद्र सरकारला टोला – बँकेचा पैसा लुटून सरकार चालवण्याचं धोरण

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2022: : एबीजी ग्रुपच्या (ABG Shipyard) 28 बँकांशी झालेल्या फसवणुकीप्रकरणी काँग्रेसने केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर निशाणा साधलाय. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर आरोप केला की, मोदी सरकारच्या सात वर्षांत बँकांच्या एनपीएमध्ये वाढ झालीय. बँकेचा पैसा लुटून सरकार चालवायचं हे केंद्र सरकारचं धोरण असल्याचे ते म्हणाले.

रणदीप सुरजेवाला म्हणाले, “एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाची 22,842 कोटी रुपयांची हे आतापर्यंतची सर्वात मोठी बँक फसवणूक प्रकरण आहे. सुरजेवाला म्हणतात की, फसवणूक करणाऱ्यांना फसवणूक करण्याची पूर्ण संधी दिली जात आहे.

रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केलं की, “2,20,00,00,00,842 रुपयांच्या पैशांची फसवणूक झाली आहे. मोदी सरकारच्या देखरेखीखाली 75 वर्षातील भारतातील सर्वात मोठी बँक फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या 7 वर्षात ₹ 5,35,000 कोटींच्या ‘बँक फ्रॉड’ने आपली ‘बँकिंग सिस्टिम’ उद्ध्वस्त केलीय.

एबीजी ग्रुपने बँकांशी केलेल्या फसवणुकीने घोटाळ्यांचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवण्यात आलाय.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर रणदीप सुरजेवाला म्हणाले की, हा भाजपचा सुनियोजित कट आहे. 5 वर्षांपूर्वी चरणजीत सिंह चन्नी यांचं नाव नव्हते आणि ते निवडणुकीच्या अवघ्या दहा दिवस आधी आलं.

आप आणि भाजपचा अजेंडा एकच

पंजाबच्या लढाईत उडी घेतलेल्या आम आदमी पक्षावर निशाणा साधत रणदीप सुरजेवाला म्हणाले की, दोन्ही पक्षांचे धोरण फूट पाडा आणि राज्य करा. यावेळी सुरजेवाला यांनी ‘आप’ची तुलना मुघल आणि ब्रिटिश राजवटीशी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा