नवी दिल्ली, २५ जानेवारी २०२३ : माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बीबीसीच्या पंतप्रधानांवरील डॉक्युमेंट्रीच्या वादानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे. अनिल अँटनी यांनी बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीबाबत सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
अनिल अँटोनीने काँग्रेसच्या सोडचिठ्ठी दिल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे. या अनिल अँटोनी ट्वीटमध्ये म्हटले, मी काँग्रेस पक्षाने मला दिलेल्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून असहिष्णुतेमुळे माझ्यावर ट्वीट डीलीट करण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
दरम्यान, अनिल अँटोनी यांनी सोमवारी ट्विट केले, ‘भाजपसोबत मतभेद असूनही मला वाटते की, बीबीसी हे पूर्वग्रहांचा दीर्घ इतिहास असलेले ब्रिटिश राज्य प्रायोजित चॅनेल आहे. भारतातील लोक यांचे मत खुले करतात. मात्र त्यांच्यामुळे आपले सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते. माझे ट्विट मागे घेण्यासाठी भाषण स्वातंत्र्याबद्दल बोलणाऱ्या लोकांकडून आवाहन करण्यात आले होते, जे माझ्यासाठी असह्य आहे. मी याला नकार दिला. अनिल अँटोनी दिलेली प्रतिक्रिया ही भाजपला पूरक होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.