नववर्षाच्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्याचा स्टेजवर गोळीबार, गुन्हा दाखल

भोपाळ, ३ जानेवारी २०२३ : मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार सुनील सराफ यांनी नववर्षाचे स्वागत करताना हवेत गोळीबार केल्याने, त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनुप्पूर जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात सुनील सराफ यांनी भर स्टेजवरुन गोळीबार केला. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर केला डान्स

व्हायल व्हिडीओत सुनील सराफ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ चित्रपटातील ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. नाचत असतानाच त्यांनी पिस्तूल बाहेर काढले आणि हवेत गोळीबार केला. भोपाळमधील कोतमा शहरात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, सुनील सराफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

  • सुनील सराफ म्हणाले…

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनील सराफ यांनी आपण जो गोळीबार केला तो खोटा असून, ती फटाक्यांची बंदूक असल्याचा दावा केला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.