कुर्‍हाडीचे सपासप वार करत अज्ञातांनी केली काँग्रेसच्या नेत्याची हत्या…..

नागपूर, १७ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्रात कोरोना संकट असले तरी गुन्हेगारीचे सत्र देखील चालू आहे. ज्यामध्ये मुंबई, पुणे अशी शहरे या गुन्हेगारीत पुढे होते. तिथेच आता उपराजधानी नागपूर मध्ये देखील हे सत्र चालू झाले आहे. नागपूर मध्ये दिवसा ढवळ्या एका नेत्याची हत्या करण्यात आली. ज्यामुळे संपुर्ण नागपूर शहर हे हादरले आहे.

सध्या नागपूर शहरात कोरोनाचे संकट असताना आता पोलिसांना वाढत्या गुन्हेगारीला देखील आळा घलण्याचे संकट निर्माण झाले आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांंच्यावर अज्ञातांनी कु-हाडीचे सपासप वार करत हत्या करण्यात आली आहे. उसरे हे गड्डीगोदाम येथे राहतात. अचानक झालेल्या हल्यामुळे त्यांना काही समजलेच नाही आणि ते भांबावून गेले.ज्या मध्ये ते तिथेच रक्ताच्या थारोळात तडफडत होते. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्यानंतर आपराधी घटनास्थळावरुन पसार झाले.

नेत्यांना मारण्याचा अशा अनेक घटना या आधी देखील घडल्या आहेत. मागील काही दिवसात भाजपच्या एका नेत्याचा देखील फाशी घेऊन संशयास्पद मृत्यू झाला होता. ज्यामध्ये त्यांच्या घरच्यांनी ते फाशी नसून हत्याच आहे असे सांगितले होते. तर दिवसाढवळ्या झालेल्या या हल्लामुळे नागपूर शहर देखील चांगलेच हादरले. या घटनेचा पुढील तपास हे पोलिस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा