काँग्रेस पक्षाला आत्मचिंतनाची गरज…

पुणे, १७ नोव्हेंबर २०२०: भारत देशात ५० वर्षापेक्षा अधिक काळ सत्ता चालवणारा पक्ष म्हणजे काँग्रेस. पण, हल्ली देशात भाजपाने सत्ता प्रस्थापित केली आणि काँग्रेस ला उतरती कळा लागायला सुरवात झाली. २०१४ च्या निवडणुकीत देशात सत्तांतर झाले आणि भाजप पक्षाला एक हाती सत्ता मिळाली. त्यानंतर २०१९ मधे देखील हेच चित्र कायम स्वरूपी पहायला मिळाले.

काँग्रेस सारख्या मजबूत पक्षाने एकदा पराभव स्वीकारल्या नंतर त्यांच्याकडे असलेली विरोधी पक्षाची भूमिका निभवण्यात ते सक्षम अपयशी ठरले. एव्हढेच काय तर परभवानंतर तो का झाला आसवा याचं चिंतन त्यांनी केलेलं दिसत नव्हते.

परिणामी इतर राज्यात काँग्रेस पेक्षा दुसऱ्या पक्षांना जास्त जागा मिळू लागल्या. राज्यात २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युती करून निवडणूक लढवली ज्याचे नायक हे राष्ट्रवादी पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार राहीले आणि काँग्रेस पुन्हा कुठेतरी कमी पडताना दिसली. तरी देखील राज्यात उद्धव ठाकरेंच्या नाराजी आणि शरद पवार यांच्या राजकीय खेळी मुळे महाविकास आघाडी चे अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे सरकार आले.

काँग्रेस ने प्रत्येक पराभवानंतर बैठक घेऊन चिंतन करणे गरजेचं होतं पण, या उलट परिस्थितीत काँग्रेस पक्षानं आपापसातच आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. एव्हढंच काय तर अध्यक्ष पदावरून देखील पक्षात नाराजी आणि खडाजंगी पहायला मिळाली.

नुकतीच बिहार निवडणूक पार पडली. ज्यामधे काँग्रेस राजद मिळून महागठबंधन बरोबर लढत होती.ज्या मधे राजद जास्त जागा जिंकून बिहार मधील सर्वात मोठा पक्ष बनला खरा पण आतीतटीचा लढ्यात नेतृत्व हे एनडीए ला भेटले आणि गतवर्षी पेक्षा काँग्रेस ने यंदा अजून खराब कामगिरी केली.

बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरी मुळे राजद चा हिरमोड झाल्याचं पहायला मिळतोय. बिहार मधे ७० जागा लढवून काँग्रेसने फक्त १९ जागेवर विजय मिळवला तर त्या आधी २०१५ साली काँग्रेसने ४० जागा लढवून २७ जागांवर विजय मिळवला होता.काँग्रेसच्या खराब कामगिरी मुळेच तेजस्वी मुख्यमंत्री बनू शकले नाहीत, असे राजद च्या नेत्यांना वाटत आहे. राजद चे नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधीवर टीका केली आहे.त्यांच्या या टिकेमुळे काँग्रेसचे नेते देखील रागवले असून त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बिहार निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एव्हीएम वर प्रश्न उपस्थितीत केला तर आता आणखीन एका काँग्रस नेत्याने महिला नेत्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. कमलनाथ नंतर माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांच्या बद्दल वक्तव्य केले आहे.”जर इमरती देवी यांना आयटम म्हटंल्याने काँग्रेसचे नुकसान झाले असेल तर मग त्यांचा निवडणूकीत पराभव का झाला?इमरती देवी जिलेबी बनल्या आहेत” असे ते म्हणाले.

एकीकडे सज्जन सिंह वर्मा यांनी असे वक्तव्य केले तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते उदित राज यांनी अनुष्का विराट यांच्या वर भारतीय संघाचा कर्णधार विराट हा तर अनुष्का शर्माचा पाळीव प्राणी आहे, असे ट्विट केले आहे.”अनुष्का,तु आपल्या श्वानाला म्हणजे विराट कोहलीला पाळण्याची गरज नाही.श्वानापेक्षा कुणीही जास्त प्रामाणिक नाही. कोहली तु,मूर्ख लोकांना प्रदुषणामुळे मानव जातीला धोका आहे, असे तु शिकवायला गेलास. तुमच्या सारख्यांचा एकदा तरी डिएनए तपासला पाहीजे.”अशी जहरी टिका केली.

एकंदरीतच अश्या पद्धतीचे विधान करणे किंवा प्रश्न उभारून काँग्रेस पक्षाची प्रतिमा हि देशभरात उभारेल कि…. पण या सर्वात मात्र एक गोष्टीची आज या पक्षात नक्कीच कमी भासत आहे, ती म्हणजे “मुझे पता नहीं में जिवित रहू या न रहूं ओर जब तक मुझ में सांस है … तब तक सेवा में ही जाएगा…ओर जब मेंरी जान चली जाऐगी…तो में यह कह सकती हूँ कि…एक एक खून का कतरा मेंरा है वो एक एक खून भारत को जिवित करेंगा…” तर राजकारणात न येण्यारे राजीव गांधी देशाचे तरूण नेतृत्त्व करणारे पंतप्रधान बनले आणि उराशी २१ व्या शतकातील आधुनिक भारताचं स्वप्न बाळगलं जे आज सत्यात उतरताना प्रत्येक भारतीय अनुभवतोय

२०२४ च्या निवडणुकीची तयारी तर भाजप पक्षाने आता पासूनच सुरू केली आहे.तर काँग्रेस पक्ष स्वत:चे चितंन करून झालेल्या सर्व गोष्टी विसरून येणारा निवडणूकीच्या मैदानात विरोधी पक्षाच्या विरोधात पुन्हा आव्हानात्मक रणशिंग फुंकेल की…..

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा