नागपुर येथील महारॅलीच्या पुर्व तैयारीसाठी जालन्यात काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न

जालना, २६ डिसेंबर २०२३ : काँग्रेस पक्षाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी नागपुर येथील आयोजित “है तैयार हम” महारॅलीच्या पुर्व तयारी साठी जालन्यात जिल्हा काँग्रेस कमीटीची बैठक संपन्न झाली. नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या”है तैयार हम” महारॅली साठी देशभरातून काँग्रेस नेते येणार असून जालना जिल्ह्यातुन काँग्रेसचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नागपूरला जाणार असल्याची माहिती काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.

यावेळी बोलताना आमदार गोरंट्याल म्हणाले की, या सभेसाठी महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू आहे. काँग्रेस पक्षाचा १३८वा स्थापना दिवस हा विदर्भाच्या भूमीत उत्साहाने साजरा होणार आहे. विदर्भाने आणि महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस पक्षाला नेहमी साथ दिली. त्यामुळे२८ डिसेंबर रोजी होणारी काँग्रेस पक्षाची ही सभा ऐतिहासिक होईल.

या बैठकीस अखिल भारतीय काॅग्रेंस कमेटीचे सचिव (निरिक्षक) प्रदिप नरवाल, प्रदेश सरचिटणिस जिल्हा प्रभारी माजी आमदार नामदेवराव पवार, आमदार राजेश राठोड यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा