मुंबई, ६ जुलै २०२३ : महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी घडतील याचा काही अंदाज राहिलेला नाही.
चार दिवसांपूर्वी अजित पवार यांनी उपुमख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने संपूर्ण राज्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये आता शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतही फूट पडलीय. अजित पवार आमदारांचा एक मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्षनेते पद आता काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्याच् अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज मुंबईत महाराष्ट्र काँग्रेसची बैठक बोलावलीय.
महाराष्ट्राच्या राजकारणात ३ दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडला असून विरोधात असलेले अजित पवार थेट सत्तेत सहभागी झालेत. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण अजित पवार यांनी उचललेल्या पाऊलामुळे विरोधीपक्ष नेतेपद आता कॉंग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने आज चर्चा करण्यासाठी मुंबईत महाराष्ट्र काँग्रेसने बैठक बोलावली आहे.
नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली ही बैठक होणार आहे. आणि त्यातच सध्याच्या राजकीय घडामोडींवरही या बैठकी मध्ये चर्चा होणार आहे. यातच काँग्रेस पक्ष फुटू नये याबाबत देखील चर्चा केली जाऊ शकते, तसेच अजित पवारांनी एनसीपी वर दावा केल्यानंतर सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून आत्ता काँग्रेस सभागृहामध्ये असणार आहे त्यामुळे आता काँग्रेसकडे विरोधीपक्ष नेतेपद येणार आहे.
असं असताना भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येतेय. विशेष म्हणजे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत एक सूचक वक्तव्य केलं आहे. काँग्रेस आणि अन्य पक्षाचे इतर नेते हे पक्ष बदलण्याच्या तयारी आहेत. “फक्त भाजपचं नाही तर असे अनेक जण आहेत. जे आपल्या पक्षात खूश नाहीत. कारण त्यांचे नेते स्वार्थी आहेत. ते देशाच्या विकासात बाधा निर्माण करत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल रोष आहे”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजपचं पुढचं ध्येय हे महाराष्ट्र काँग्रेसच असेल का? हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे