काँग्रेस यांचा सरकारविरोधात आक्रोश

लखनौ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारची तुलना ब्रिटिश राजवटीशी केली. स्वतंत्र संग्रामात ज्या विचारसरणीचा सामना केला होता त्याच विचारसरणीचे लोक आज देशात सत्तेवर असल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली. काँग्रेसच्या १३५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रियंका गांधी म्हणाल्या की, देश आज संकटात आहे देशांमधील कानाकोपऱ्यात सरकारविरोधी भावना आहेत परंतु सरकारकडून आवाज दाबला जात असल्याची टीका त्यांनी केली.

पोलिसांनी माझा गळा धरला

आंदोलनादरम्यान अटक झालेले निवृत्त आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांच्या निवासस्थानी जात असलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी रस्त्यावरच आडवे आले यावेळी पोलिसांनी धक्काबुक्कीही केल्याचा दावा प्रियंका गांधी यांनी केला आहे. वाहनातून अडविल्यानंतर चालत जात असताना एका महिला अधिकाऱ्याने माझा गळा धरला तर दुसऱ्याने ढकलून दिले त्यामुळे मी पडले. असा दावा प्रियंका गांधी यांनी केला. काँग्रेसने पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा आणि आदित्यनाथ सरकारचा निषेध करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा