गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय जालियनवाला बाग हत्यांकांडाचा बदला घेण्यासाठी थेट इंग्लंडच्या राणीच्या हत्येचा कट”, एका ‘भारतीया’ला...

जालियनवाला बाग हत्यांकांडाचा बदला घेण्यासाठी थेट इंग्लंडच्या राणीच्या हत्येचा कट”, एका ‘भारतीया’ला अटक

इंग्लंड, 28 डिसेंबर 2021: ख्रिसमसच्या दिवशी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांची हत्या करण्यासाठी एका शीखने राणीच्या राजवाड्यात प्रवेश केला. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी या तरुणाला राणीला मारायचे होते. पोलिसांनी आरोपीला शस्त्रासह अटक केली. ब्रिटीश मीडियानुसार, जसवंत सिंह खैल असे या 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे. नाताळच्या दिवशी घडलेल्या या घटनेची माहिती आता समोर आली आहे.

महाराणीच्या हत्येचा प्रयत्न करणार : आरोपी

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओत चेहरा झाकलेला आहे. त्यात तो म्हणतो, “1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडात ज्या लोकांचा जीव गेला त्यांचा हा बदला आहे. याशिवाय ज्या लोकांसोबत त्यांच्या वर्णावरून भेदभाव झाला, अत्याचार झाले आणि हत्या झाल्या त्या लोकांसाठी देखील हा बदला असेल. मी एक भारतीय शिख आहे. माझं नाव जसवंत सिंग चैल होतं. आज माझं नाव डार्थ जॉन्स आहे.”

मानसिक आरोग्य कायद्यान्वये अटक

स्कॉटलंड यार्डने सांगितले की, व्हिडिओचा तपास सुरू आहे. राणीला मारण्यासाठी आरोपी विचित्र हुडी आणि मुखवटा घालून राजवाड्यात घुसला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो भिंतीवर चढताना दिसत होता. त्याच्या हातात धनुष्यही होते. मानसिक आरोग्य कायद्यान्वये पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हॉलीवूड चित्रपट स्टार वॉर्स पासून प्रेरित

व्हिडिओमध्ये आरोपीने घातलेला मास्क स्टार वॉर्स या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित आहे. ‘सिठ’ ही या चित्रपटातील खलनायकाची भूमिका आहे. सिथप्रमाणेच ‘डार्थ जोन्स’ही या सिनेमाशी जोडला गेला आहे. चेलच्या व्हिडिओमध्ये पार्श्वभूमीत स्टार वॉर्सच्या पात्र डार्थ मालगसचे चित्र होते. यासोबतच मित्रांना पाठवलेल्या मेसेजमध्ये मी ज्यांच्यासोबत चूक केली किंवा खोटे बोललो त्या सर्वांची मी माफी मागतो. जर तुम्हाला हा संदेश मिळाला असेल तर माझा मृत्यू जवळ आला आहे. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा.

जालियनवाला बागेत काय घडलं?

13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी, जनरल डायरने अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे रौलेट कायद्याच्या विरोधात सभा घेणाऱ्या हजारो लोकांवर गोळीबार केला. या गोळीबारात एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश होता. तसेच 1,200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शेकडो महिला, वृद्ध आणि लहान मुलांनी जीव वाचवण्यासाठी तिथे बांधलेल्या विहिरीत उड्या घेतल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version