दिल्ली, २६ जानेवारी २०२३ : दिल्लीतील पहाडगंज पोलिस ठाण्यात एका हेड कॉन्स्टेबलने संशयास्पद परिस्थितीत स्वत:वर गोळी झाडली. यामुळे कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला. घटना पोलिस ठाण्याच्या बॅरेक क्रमांक तीनची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबलच्या बॅरेकमधून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. माहिती मिळताच पोलिस ठाण्याने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठविला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव देवेंद्र कुमार असे आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात आले आहे. आज दुपारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबलने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या बॅरेकमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटवरून तपास सुरू आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड











































