गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा सीएए विरोधात पुरंदर मध्ये संविधान प्रेमिंची निषेध सभा

सीएए विरोधात पुरंदर मध्ये संविधान प्रेमिंची निषेध सभा

पुरंदर: सीएए, एनआरसी, एनपीआर या संविधानविरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी, संविधानातील मूल्यांच्या संरक्षणासाठी पुरंदर तालुक्यातील सर्व संविधानप्रेमी व्यक्ती, पुरोगामी संस्था-संघटना, राजकीय पक्ष या सर्वांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रविवारी, दि. २६ जानेवारी, २०२० रोजी सासवड नगरपालिकेच्यासमोर निषेध सभा आयोजित करण्यात आली.

आमदार संजयजी जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने तर माजी जि.प. सदस्य प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच बहुजन हक्क परिषदेच्या वतीने सुनिल धिवार, राष्ट्र सेवा दलाचे बापू म्हेत्रे, मासूम संस्थेच्या वतीने जया नलगे, प्रेरणा सामाजिक संस्थेच्या परविन पानसरे तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुबारकभाई शेख यांनी जाहीर पाठिंबा दिला.

अॅड. विजय भालेराव, प्रा. सचिन दुर्गाडे, संतोष म्हेत्रे अॅड. कमलेश म्हेत्रे यांच्यासह राष्ट्र सेवा दल, मासूम संस्था, बहुजन हक्क परिषद, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मानस एकात्मिक विकास संस्था यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी गाणी, घोषणा देऊन यात सक्रिय सहभाग घेतला. ‘हम होंगें कामयाब’ या गीताद्वारे समारोप करण्यात आला.

error: Content is protected !!
Exit mobile version