माढा, ९ ऑगस्ट २०२०: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहर परिसरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोविड सेंटरची निर्मिती त्वरित होणे गरजेचे आहे. याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राहुल धोका यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मेलवर पत्र पाठविले आहे.
पॉझिटिव आढळल्यानंतर उपचाराचा भाग म्हणून सोलापूर किंवा बार्शीला पाठवले जाते याचा नातेवाईकांना, रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शहरात सुसज्ज कोविड सेंटर होणे गरजेचे आहे असे निवेदनात म्हटले आहे.
पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून त्यांनी नुकतेच बार्शीच्या रुग्णालयातून उपचार घेतले व बरे होऊन आल्यानंतर त्यांचे विविध संघटनांनी स्वागत केले. कोरोनाबाबतचे अनुभव सांगून नागरिकांनी नियम पाळून सुरक्षित राहण्याचे आवाहन धोका यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रदीप पाटील