पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर उलटल्याने अपघात, चालक जखमी, १० दिवसात तिसरा अपघात…..

7

पुणे: २५ जूलै २०२२: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चन्द्री गावाजवळ कंटेनर उलटल्याने अपघात झालाय. तीव्र उतार आणि पाऊस यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यान चालकाचा कंटेनरवरचे नियंत्रन सुटल्याने हा अपघात झालाय.

सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झालेली नाही. चालक मात्र यात जखमी झालायं. सद्दाम शेख असं जखमी झालेल्या चालकाचं नाव आहे. कंटेनर पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झालाय.

अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गेल्या १० दिवसातला हा तिसरा अपघात घडलायं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, रिलायंसचे अधिकारी आणि ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे.

पुणे-सातारा महामार्गाचे काम अपूर्ण असून हरिश्र्चंद्री ग्रामस्थांनी राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी अपूर्ण कामाविषयी चर्चा केली. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा