बुलढाणा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

बुलडाणा, १८ ऑगस्ट २०२०: आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून बुलढाणा जिल्ह्यातील लघू पाटबंधारे प्रकल्पा शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून धरणे पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो होत आहेत. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर.जी. पुरी यांना आज १८ ऑगस्ट रोजी प्रादेशिक मौसम केंद्र भारत मौसम विज्ञान विभाग नागपूर व मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई यांचे प्राप्त दुरध्वनी संदेशानुसार दिनांक १८.०८. २०२० व १९.०८.२०२० रोजी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

त्याअनुषंगाने नागरिकांनी आपल्या जागी सतर्क राहण्याबाबत सूचित करण्यात यावे तसेच क्षेत्रीक स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयात हजर राहावे, असा आदेश दिला आहे .

न्यूजअनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा