डिझेल बसचे सीएनजीत रुपांतर करा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, १२ ऑगस्ट २०२३ : प्रदुषणावर मात करण्यासाठी हरित ऊर्जेच्या वापरावर भर देणे आवश्यक असून, त्यादृष्टीने ‘पीएमपीएमएल’च्या डिझेलवरील सर्व बसेस सीएनजीमध्ये रुपांतरीत कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. पाटील यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीस आमदार सिद्धांर्थ शिरोळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे उपस्थित होते.

पीएमपीएमएलच्या मालकीच्या डिझेल इंधनावरील कार्यरत १२३ बसेस तसेच बंद स्थितीतील ५० बसेस अशा सर्व बसेस येत्या दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने सीएनजीवर रुपांतरीत कराव्यात, जेणेकरून पीएमपीएमएल ही संपूर्ण बसेस सीएनजी व ई-बसेसच्या रुपात हरित ऊर्जेवर आधारित सेवा होईल. चालू बसेस बंद पडण्याचे प्रमाण शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करा, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदारांकडूनच करुन घेतले जात असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी महापालिका तसेच शहर पोलिस वाहतूक शाखेने एकत्रित उपाययोजना करुन अंमलबजावणी करावी. वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी प्रयत्न करा, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा