मुंबई, २४ ऑगस्ट २०२०: मुंबईच्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी शिक्षण संस्था अर्थात आयआयटीचा दीक्षांतची सुरुवात काल ऑनलाईन पद्धतीनं झाली आहे. भौतिक शास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवलेले प्रिंसटन विद्यापिठाचे प्राध्यापक डंकन हल्डन हे या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे उपस्थित होते.
ब्लॅकस्टोनचे मुख्य कार्यकारी संचालक तसेच संस्थापक स्टीफन श्वार्जमैन हे ही या सोहळ्यात सहभागी झाले होते. पहिल्यांदाच हा सोहळा ऑनलाईन पद्धतीनं होत असून युट्युब आणि इतर सामाजिक वाहिन्यांवरून या सोहळ्याचं थेट प्रसारण करण्यात आले आहे.
काल दुपारी दीड वाजल्यापासून हा सोहळा सुरु झाला होता. दोन्ही अतिथींच्या भाषणाबरोबरच यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी पदकं प्रदान केले गेले.
न्यूज अनकट प्रतिनिधी











































