कॉर्बेव्हॅक्सची लसिकडे नागरिकांची पाठ

पुणे, कसबा पेठ ३० ऑगस्ट २०२२: बूस्टर डोस म्हणून कॉर्बेव्हॅक्सची लस घेण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, बहुतांश नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस कोव्हिडशिल्ड अथवा कोव्हॅक्सिनचा घेतला आहे.

त्यामुळे कॉर्बेव्हॅक्सबाबत अद्याप संभ्रम आहे.गेल्या १५ दिवसांमध्ये १८ वर्षांवरील ५०० हून कमी नागरिकांनी कॉर्बेव्हॅक्स लसिला पसंती दिली आहे. कोव्हिडशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कॉर्बेव्हॅक्स लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे. काही दिवसांपूर्वी कोव्हिडशिल्ड लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे कॉर्बेव्हॅक्सला बूस्टर डोस म्हणून परवानगी देण्यात आली.

ज्या नागरिकांनी कोव्हिडशिल्ड किंव्हा कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनी १२ ऑगस्ट पासून हैदराबादच्या Biological E द्वारे विकसित करण्यात आलेल्या कॉर्बेव्हॅक्स लस घेण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. मात्र, महापालिकेच्या लसिकरेन केंद्रावर १५ दिवसांत ५०० हून कमी नागरिकांनी कॉर्बेव्हॅक्सचा डोस घेतला आहे. शहरातील ६८ लसीकरण केंद्रावर १२ ते १४ वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्सचे लसीकरण केले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सुरज गायकवाड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा