प्रत्येक व्यक्तीने स्वतःची जबाबदारी घेतली तर कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवता येईल: सौरभ राव

पुरंदर, दि. ३० सप्टेंबर २०२०: माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी.असे झाले तर आपण लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवू. त्यामुळे प्रत्येकाने तोंडाला मास्क वापरावे, वैयक्तिक स्वच्छता राखावी. असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज जेजुरी येथे केले आहे.

आज जेजुरी येथील जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मार्तंड देवसंस्थान आणि प्रशासन यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या १०० बेडच्या ‘श्री मार्तंड कोविड केअर सेंटर’चे उद्घाटन विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी राव बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मुख्याधिकारी पूनम शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने मार्तंड देवासंस्थानाचे प्रमुख विस्वस्थ संदीप जगताप तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

 

सध्या देशासह राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट आहे अशावेळी एकजुटीने या संकटाशी सामना करण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केले. तर पुणे जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणी करीत आहोत, देशात सर्वात जास्त  तपासणी पुणे जिल्ह्यात झाली आहेत. त्यामुळे आपल्याकडे कोरोना रुग्ण संख्या जास्त दिसते, त्यामुळे आपण त्यांच्यावर तातडीने उपचार करू शकलो. त्यामुळे आपल्याकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. जेजुरी देवास्थानासारखी देवस्थाने व सामाजिक संघटना यांनी सरकारच्या मदतीला यायला हवे. मार्तंड देवस्थानाने घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद असल्याचे म्हणत तालुक्यामार्तंड देव संस्थानाचे त्यानी कौतुक केले.

गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी जेजुरी येथील कोविड सेंटर सुरु करण्यात आले असुन राज्यातील आदर्श असे हे कोविड सेंटर करून दाखवण्याचा विश्वास देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन देवसंस्थानचे विश्वस्त राजकुमार लोढा, अशोकराव संकपाळ, शिवराज झगडे, पंकज निकुडे, प्रसाद शिंदे, तुषार सहाणे, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे आणि  इतर कर्मचारी यांनी केले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा