मुंबई, १५ जून २०२० : तीन महिन्यापुर्वी आलेल्या कोरोनाने संपूर्ण जगात आपले पाय पसरून प्रत्येक गोष्टीवर आपला प्रादुर्भाव सोडला आणि त्यामुळे आता उठण्या-बसण्या , खाण्या पिण्यापासून ते खेळापर्यंत सर्वांचेच निकष बदलत आहेत. याचाच एक भाग म्हणजे आयसीसी घेतलेला निर्णय.
कोरोनाच्या लक्षणामधील एक गोष्ट म्हणजे तो जवळ असलेल्या व्यक्तीला बाधीत करतो, आणि जगात असे बरेच खेळ आहेत ज्यात एक पेक्षा जास्त खेळाडू असतात यातील एक खेळ म्हणजे क्रिकेट. या खेळात ११ खेळाडू एका संघाचे दोन प्रतिसंघाचे व दोन पंच असे १५ जण एकत्र असतात तसेच या खेळात चेंडूचा संपर्क हा सगळ्यांच्या हाताला होतो आणि याच पार्श्वभूमीवर ICC ने काय नविन नियम लागू केले आहेत ते पुढीलप्रमाणे.
* स्टेडियम मध्ये जल्लोष साजरा करण्यास मनाई .
* चेंडू चमकण्यासाठी लाळ वापरण्यास बंदी .
* जर चेंडूला लाळ लावली तर इनिंगमध्ये प्रत्येक संघाला २ वेळा चेतावणी दिली जाईल. तिसर्या वेळेल पेनल्टी म्हणून फलंदाजी करणा-या संघाच्या खात्यात ५ धावा जोडल्या जातील.
* कोरोनामुळे सर्व क्रिकेट बोर्डाचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची भरपाई करण्यासाठी, टेस्टमध्ये खेळाडूंच्या जर्सी आणि स्वेटरच्या पुढील भागावर ३२ इंचाचा लोगो (जाहिरात) मंजूर करण्यात आली आहे.
* कोरोनामुळे सर्व क्रिकेट बोर्डाचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची भरपाई करण्यासाठी, ३२ इंचाचा लोगो (जाहिरात) चाचणीत खेळाडूंच्या जर्सी आणि स्वेटरच्या पुढील भागावर ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यापूर्वी फक्त एकदिवसीय आणि टी – २० सामन्यात जर्सीच्या पुढच्या बाजूला खेळाडूंना जाहिरतीसाठी परवानगी देण्यात आली होती.
* सामन्यात एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले तर त्याऐवजी दुसरा पर्यायी फलंदाज मैदानात उतरता येईल. नियमानुसार फलंदाजाची जागा संघात फलंदाजच घेईल. गोलंदाजाच्या बाबतीतही असेच होईल. संक्रमित खेळाडूची जागा कोण घेईल याचा निर्णय सामनाधिकारी घेतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी