मुंबई, 17 जानेवारी 2022: देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी जो आकडा एक लाखाच्या पुढं जात होता, तो आता अडीच लाखांचा आकडाही पार केलाय. महाराष्ट्र, दिल्ली, बंगाल, कर्नाटक आणि तामिळनाडू कोरोनाची सर्वात मोठी केंद्रं आहेत. तरीही या राज्यांतून सर्वाधिक प्रकरणं समोर येत आहेत.
महाराष्ट्र कोरोनाचा केंद्रबिंदू
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41 हजार 327 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील 7985 प्रकरणांचाही समावेश आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वेगवान दिसत आहे, मात्र मायानगरीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या कमी झालीय. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत सातत्याने कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. चाचणीबद्दल नक्कीच प्रश्न आहे, परंतु परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत सुधारली आहे.
आकडेवारीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे 2,65,346 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचा नवीन प्रकार, ओमिक्रॉन, महाराष्ट्रातही झपाट्यानं पसरला आहे. रविवारीही आठ प्रकरणं समोर आली आहेत. एकूण आकडा 1738 वर पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या पुढं गेलो तर आता गुजरातमध्येही कोरोनाचा भीषण स्फोट झालाय.
गुजरातमध्ये वाढली प्रकरणं
गेल्या 24 तासात 10150 केसेसची नोंद झालीय. तिकडं, कोरोनाचे हॉटस्पॉट अहमदाबाद राहिले आहे, जिथं सर्वाधिक 3315 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय सूरतमध्ये 2757 आणि राजकोटमध्ये 467 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 8 जणांचा मृत्यू झालाय. राजधानी दिल्लीतही रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.
दिल्लीची स्थिती
रविवारी राजधानीत 18286 नवीन रुग्ण आढळले असून 28 लोकांचा मृत्यू झालाय. सध्या तरी संसर्ग दरात घट दिसून येत नाही. सध्या दिल्लीत सकारात्मकता दर 27.87% आहे. चाचणीबद्दल बोलायचं झाल्यास, गेल्या 24 तासांत 65,621 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मागील दिवसांच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे कारण यापूर्वी राजधानीतच 90 हजाराहून अधिक चाचण्या पाहिल्या गेल्या होत्या. सध्या दिल्लीतील कंटेनमेंट झोनची संख्या 32,983 झाली आहे.
दक्षिण भारताकडं तामिळनाडूमध्ये कोरोनाची प्रकरणं नोंदवली जात आहेत. रविवारी राज्यात 23,975 नवीन रुग्ण आढळले आहेत, एकट्या चेन्नईमध्ये 8987 रुग्णांची नोंद झालीय. गेल्या 24 तासांत या विषाणूमुळं 22 जणांचा मृत्यू झालाय. कर्नाटकबद्दल बोलायचं झालं तर तिथं रोज नवनवीन विक्रम होत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे