गोल पोस्ट महाराष्ट्र महसूलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनाच कोरोनाचा संसर्ग; कार्यालय लॉकडाऊन

महसूलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनाच कोरोनाचा संसर्ग; कार्यालय लॉकडाऊन

राजगुरूनगर, दि. २२ जुलै २०२०: खेड उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी संजय तेली यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने महसूल विभागाच्या कार्यालयात खळबळ उडाली आहे, या अगोदर खेड पोलीस स्टेशन मधील एक वरिष्ठ अधिकारी यांचा ही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या पोलीस स्टेशन मधील इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या चाचण्या घेण्यात आल्या, त्या निगेटिव्ह आल्या असल्याने पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास जरी सोडला असला तरी मात्र महसूल कार्यालयात चिंताजनक परिस्थिती आहे.

प्रांत अधिकारी यांनी मागील आठ ते दहा दिवसात महसूल अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली होती. यामुळे आता प्रांत कार्यालयात असणारे अधिकारी व कर्मचारी यांना क्वाँरन्टाईन करण्याचे आदेश दिले असून कार्यालय पुढील आदेश येई पर्यंत बंदच राहणार आहे.

प्रांत अधिकारी संजय तेली यांना मागील आठवड्यात तब्येत ठीक नसल्याने खेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन नंतर पुण्यात एका नामांकित रुग्णालयात उपचार घेतले होते, त्यानंतर त्या ठिकाणी नमुने घेतले असता त्याचे रिपोर्टर हे पॉझिटिव्ह आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुनील थिगळे

error: Content is protected !!
Exit mobile version