सफाई कर्मचारी महिलेला कोरोना संसर्ग आमराईतील ‘तो’ परीसर सील

बारामती, दि. १९ जून २०२०: बारामतीत  २३  वा कोरोना चा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. नगरपरीषदेमध्ये २९ वर्षीय महिला रुग्ण कॉन्ट्रक्टवर सफाई कामगार म्हणुन काम करते. या महिलेच्या रुपाने कोरोनाने आता नगरपरीषदेत प्रवेश
केला आहे. शहरातील कोविड रुग्णालयात या महिला रुग्णाला दाखल करण्यात आले आहे.

हि महिला रुग्ण शहरातील आमराई परीसरात वास्तव्यास आहे. हि माहिला तिच्यासमवेत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसमवेत एका शिबीरात गेल्यानंतर तिने कोरोना तपासणी केली होती. यावेळी त्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला, तर इतर महिलांची चाचणी निगेटीव्ह आली.  सुरवातीला या महिला रुग्णाचा
कोरोनाचा खासगी अहवालानुसार पॉझिटीव्ह
आला. त्यानंतर या महिलेला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

तिच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. याबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी माहिती  दिली. तसेच तिच्या कुटुंबिंयांना देखील कोरोना तपासणीसाठी हलविण्यात आले आहे.
आज सापडलेली महिला रुग्ण बारामती शहरातील ही ७ वी कोरोना बाधित  आहे.

बारामतीत एकुण संख्या आता  २३  वर जाउन पोहचली आहे. बारामती शहर कोरोना मुक्त करण्यात प्रशासनाला यश आले होते. ३० एप्रिल रोजी शहरातील शेवटचा रुग्ण सापडला होता. आज ५० दिवसांनी  शहरात कोरोना रुग्ण सापडला आहे.

आमराई परिसरातील सुहासनगर घरकुल जयभिम स्तंभ ते सिध्दार्थनगर चौक ते सचिन काकडे किराणा दुकान ते दामोदरे रॉकेल दुकान ते धनंजय तेलंगे ते वसाहत चौक ते जयभिम स्तंभ सुहासनगर घरकुल चौक ही सीमा  गृहीत धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. नागरीकांनी  आरोग्याची काळजी घ्यावी लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी  बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व त्याने सॅनिटाझरचा वापर करणे  अत्यंत  गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा आणि सुव्यवस्था कामे सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे. शहरात कल्याणीनगर
श्रीरामनगर, समर्थनगर म्हाडा वसाहत, कल्याणीनगर परिसरसह तालुक्यात माळेगाव, कटफळ, मुर्टी, वडगांव निंबाळकर, सिध्देश्वर निंबोडी, कोºहाळे  येथे आजपर्यंत कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा