गोल पोस्ट स्पॉटलाइट रियाची चौकशी करणाऱ्या पोलीस आयुक्तांना कोरोनाची लागण

रियाची चौकशी करणाऱ्या पोलीस आयुक्तांना कोरोनाची लागण

मुंबई, २९ ऑगस्ट २०२०: सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवतीला सीबीआयने चांगलेच धारेवर धरले आहे. ज्यामधे तिची सर्व स्तरावर कसून चौकशी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अभिनेत्री रियाची चौकशी करणारे पोलीस उपायुक्त आभिषेक त्रिमुखे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांच्या संपुर्ण कुंटूबालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान रियाने सुशांतच्या आत्महत्येनंतर लगेचच त्रिमुखे यांच्याशी संपर्क साधला होता. तिने त्यांना ४ काॅल आणि १ मेसेज केला होता.

त्रिमुखे आणि त्यांच्या कुटुंबाची प्रकृती ठिक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची देखील लवकरच चाचणी केली जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version