दौंड, दि.१६, मे २०२० : दौंड शहरातील एका नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याने सामूहिक संसर्गाचा धोका निर्माण वाढला आहे. आजवर फक्त राज्य राखीव बलाच्या तुकडीतील जवानांना याची बाधा झाल्याचे दिसून येत असताना कोरोनाच्या शहरातील प्रवाशाने मात्र प्रशासनाची चिंता वाढवली आहे.
दौंड तालुक्यातील दहिटने येथे आज (शनिवारी) पहिल्या रुग्णाची तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची बातमी आल्याने समाधान व्यक्त केले. मात्र अगदी काही दिवसातच यावर विर्जन पडले आणि शहरात कोरोनाच्या संसर्गाची बातमी पसरल्याने सर्वसामान्य नागरिक व नगर पालिकेच्या प्रशासनाच्या काळजीत भर पडली.
दौंड शहरातील एक व्यक्ती याच बरोबरीने एसआरपी गट क्र. ७ मधील एक जवान आणि दौंड येथील भारतीय रिझर्व बाटालीयन कोल्हापूर गट क्र १६ चे तीन जवान असे एकुण पाच व्यक्तींची आरोग्य चाचणी कोरोना पॉसिटीव्ह आली असल्याची माहीती उप जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.
दौंड शहरात यापूर्वीच्या लॉक डाऊनच्या काळात बहुतांश ठिकाणी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मात्र अगदीच शेवटच्या काळात परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. नुकतेच दौंडमधील सर्वसामान्य व्यवहार सुरू करण्यास काही प्रमाणात परवानगी दिली होती. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात प्रशासन काय पावले उचलणार हे पाहणे आवश्यक आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख