कोरोनामुळे झाला पोलीसाचा मृत्यू

4

उस्मानाबाद, २३ मे २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रूग्णांच्या मृत्यू संख्येत हळूहळू वाढ होत आहे. परांडा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या १ पोलीस कर्मचाऱ्याचा रात्री मृत्यू झाला. हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे समोर आले असता पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. परांडा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा संबंधित पोलीस कर्मचारी मागील काही दिवस मेडिकल रजेवर होता, परंतु त्याची प्रकृती जास्तच बिघडल्यामुळे त्यांना उपचाराकरिता सोलापूरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान रात्री २.३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हा कोरोना मुळे झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्यात आज दिनांक २३ जून रोजी कोरोना बाधीत रूग्णांची मृत्यूची संख्या ही ८ झालेली असून त्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. जिल्ह्यात सध्या ४० अॅक्टीव रूग्ण असून एकूण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या १८४ झालेली आहे त्यातील १३६ रूग्णांनी कोरोना वर मात केलेली आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा