महाराष्ट्र, ३० ऑगस्ट २०२०: कोरोनाने जगभरात थैमान घातले असून, आजपर्यंत या व्हारयसमुळे लाखो बळी गेले आहेत. अजूनही त्याचा विळखा हा राज्याभोवती घट्ट होताना दिसतोय. आजपर्यंत राज्याने ७ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर याच व्हायरसने महाराष्ट्राच्या तीन डाॅक्टरांना मृत्यूच्या कवेत घेतले आहे.
बुलढाणा, अकोला आणि भुसावळमधील डाॅक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. बुलढाण्यातील डाॅक्टर गोपाळ क्षीरसागर, भुसावळचे गरीबांचे डाॅक्टर म्हणून ख्याती असलेले डाॅक्टर मनोहर खानपूर आणि अकोल्यातील डाॅक्टर विवेक फडके यांचे कोरोनाने निधन झाले.
कोरोनाच्या लढ्यात डाॅक्टरांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला तर, राज्यातील या तिन्ही डाॅक्टरांच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जातोय.
न्युज अनकट प्रतिनिधी