मुंबईच्या महापौरांच्या भावाचा कोरोनाने मृत्यू 

4

मुंबई, दि. १ ऑगस्ट २०२०: मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचा कोविड – १९ मुळे मृत्यू झाला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे मोठे भाऊ सुनील कदम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी कोरोनामुळे त्यांचे निधन झाले आहे.

एप्रिल महिन्यात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्याने किशोरी पेडणेकर यांनी १४ दिवस स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले होते.

मात्र आता त्यांच्या भावाच्या निधनाने त्यांच्यावर दुःख कोसळले आहे. त्यांनी एक छोटीशी कविता लिहून आपल्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा