कोरोना लढाईतील महत्वाचा घटक एसआरपी जवान

15

पुणे, दि.२५ मे २०२०: सध्या कोरोनाच्या लढाईत सर्वजण जण आपल्या पद्धतीने लढताना दिसत आहेत. त्यात विशेष डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी, मनपा कर्मचारी हे कोरोना योद्धा बनून कोरोनाचा सामना करत आहे. मात्र, अजून एक घटक असा आहे की, या कोरोनाच्या लढाईत या सर्वांच्या बरोबरीने लढताना पहायला मिळत आहे. तो घटक म्हणजे एसआरपी जवान.

आज भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यात एसआरपी जवानही तेवढ्याच क्षमतेने लढताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रात जवळपास १७ हजाराहून अधिक जवान कोरोना योध्दा म्हणून लढत आहेत. महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांची एकूण संख्या विचारात घेतल्यास डॉक्टर, नर्स,महानगरपालिका कर्मचारी,पोलीस किंवा इतर कर्मचारी यांचे पैकी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त हे राज्य राखीव पोलीस बलाचे अधिकारी व जवान झालेले आहेत.

मात्र याची महिती एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने देणे महत्वाचे वाटले नाही. सरकारने या राज्य राखीव पोलीस बलाचे जवान २४ तास नव्हे तर २ ते ३ महिने आपल्या कुटुंबापासून अलिप्त राहुन कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांचाही विचार करणे गरजेचे आहे.

तरी देखील त्यांच्या विषयी असलेल्या बातम्या माध्यमांवर दाखवल्या जात नाहीत. मात्र सर्वात जास्त तणावाखाली हे जवान आहेत.
एसआरपी जवनांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र याकडे राज्य प्रशासन दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एस आरपी जवानांना पाचारण करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांवर वचक बसेल. पण या जवाणांचाही या लढ्यात तेवढाच सहभाग आहे जेवढा डॉक्टर आणि पोलीस प्रशासनाचा आहे.

त्यामुळे त्यांच्या संबंधातील प्रत्येक घडामोड आपल्याला मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी माध्यमांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. या एस आरपी जवानांच्या कार्याला “न्युज अनकट” कडून मानाचा मुजरा.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा