कोरोना मुळे मुंबई महानगरपालिकेत तातडीची भरती

9

मुंबई, दि. १ मे २०२० : सध्या कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. वैद्यकीय सेवांवर प्रचंड भर आलेला आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासू लागला आहे. १०००० लोक मदतीसाठी तयार झाले आहेत आणि त्यांना प्रशिक्षण देखील दिले जात आहे. परंतु अपुऱ्या मनुष्य बळामुळे अजूनही कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्या अनुषंगाने दिनांक ११.१२.२०१७ रोजी मुंबई महानगर पालिकेची परीक्षा झाली होती. ही भरती रद्द झाली होती परंतु आता पुन्हा उमेदवारांमधून, ‘कोविड-१९’च्या प्रादुर्भावामुळे बाधीत झालेल्या रुग्णांच्या सेवेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘कामगार/कक्ष परिचर’ या पदावर काम करण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

सदर बाब अत्यंत तातडीची असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांनी निवड यादी प्रसारित झाल्यापासून नियुक्तीसाठी सात दिवसांच्या आत आधार कार्ड/पॅन कार्ड तसेच इतर सर्व मूळ कागदपत्रांसहीत प्रमुख कामगार अधिकारी यांचे कार्यालय, सहावा मजला, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपलिका मुख्यालय, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. या ठिकाणी दिनांक ३०.४.२०२० ते दिनांक ०६.५.२०२० पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत उपस्थित रहावे.

प्रवासातही परवाना कसा मिळवावा:
“द एपिडॅमिक डिसीज ऍक्ट १८९७” आणि “डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट २००५” अंतर्गत सदर बाब अत्यंत तातडीची असल्यामुळे आणि त्यांची नियुक्ती केवळ ‘कोव्हीड-१९’ बाधीत रुग्णसेवेसाठी आणि ‘कोव्हीड-१९ ‘बाधीत रुग्ण असलेल्या
रुग्णालयांमध्ये असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांनी निवड यादीची प्रत आणि स्वत:च्या ओळखीबाबतचा पुरावा दाखवून प्रवासासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक यांजकडून परवानगीने विहित मुदतीत उपस्थित रहावे. याविषयी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना विनंती करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी