नवी दिल्ली, १ ऑगस्ट ,२०२० : कोरोना दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. प्रयत्नांना यश येत आहे, परंतू रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सर्वांनाच प्रश्न पडला आहे, कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात केव्हा येईल. कोरोनाने आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला आहे. आतापर्यंतच्या सर्वोच्च आकड्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ५७ हजार ११७ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत भारतात एकूण १६ लाख ९५ हजार ९९८ इतकी झाली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू सुद्धा खूप झाले आहेत. गेल्या २४ तासात भारतात ७६४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.
देशात सध्या ५ लाख ६५ हजार १०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १० लाख ९४ हजार ३७४ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट हा ६३ टक्क्यांच्या वरती गेला आहे. एकूण अॅक्टिव केसेस पैकी डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. ही एक दिलासा देणारी बाब आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरॆ.